मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १:१सुमारे इ.स.पू. ५

    आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले.

  2. लूक १:२सुमारे इ.स.पू. ५

    या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्‍यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत.

  3. लूक १:३सुमारे इ.स.पू. ५

    सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे.

  4. लूक १:४सुमारे इ.स.पू. ५

    यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.

  5. लूक १:५सुमारे इ.स.पू. ५

    यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्‍याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.

  6. लूक १:६सुमारे इ.स.पू. ५

    दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.

  7. लूक १:७सुमारे इ.स.पू. ५

    त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.

  8. लूक १:८सुमारे इ.स.पू. ५

    एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्‍याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना,

  9. लूक १:९सुमारे इ.स.पू. ५

    परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.

  10. लूक १:१०सुमारे इ.स.पू. ५

    आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.

  11. लूक १:११सुमारे इ.स.पू. ५

    तेव्हा जखर्‍याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला.

  12. लूक १:१२सुमारे इ.स.पू. ५

    त्याला पाहताच जखर्‍याह चकित आणि भयभीत झाला.

  13. लूक १:१३सुमारे इ.स.पू. ५

    पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्‍याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव.

  14. लूक १:१४सुमारे इ.स.पू. ५

    तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल.

  15. लूक १:१५सुमारे इ.स.पू. ५

    तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  16. लूक १:१६सुमारे इ.स.पू. ५

    तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल.

  17. लूक १:१७सुमारे इ.स.पू. ५

    तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”

  18. लूक १:१८सुमारे इ.स.पू. ५

    जखर्‍याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.”

  19. लूक १:१९सुमारे इ.स.पू. ५

    यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही शुभवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठविण्यात आले आहे,

  20. लूक १:२०सुमारे इ.स.पू. ५

    आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.”

  21. लूक १:२१सुमारे इ.स.पू. ५

    इकडे लोक जखर्‍याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले.

  22. लूक १:२२सुमारे इ.स.पू. ५

    तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता.

  23. लूक १:२३सुमारे इ.स.पू. ५

    मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला.

  24. लूक १:२४सुमारे इ.स.पू. ५

    त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली.

  25. लूक १:२५सुमारे इ.स.पू. ५

    ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.”