मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.

  2. तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता.

  3. योहान १:३सुमारे इ.स.पू. ४००४

    शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही.

  4. योहान १:४सुमारे इ.स.पू. ४००४

    त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.

  5. योहान १:५सुमारे इ.स.पू. ४००४

    तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही.

  6. योहान १:६सुमारे इ.स. ५

    परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले.

  7. योहान १:७सुमारे इ.स. ५

    तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.

  8. योहान १:८सुमारे इ.स. ५

    तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता.

  9. योहान १:९सुमारे इ.स. ५

    जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता.

  10. योहान १:१०सुमारे इ.स. ५

    तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही.

  11. योहान १:११सुमारे इ.स. ५

    ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही.

  12. योहान १:१२सुमारे इ.स. ५

    परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—

  13. योहान १:१३सुमारे इ.स. ५

    ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.

  14. योहान १:१४सुमारे इ.स. ५

    शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.

  15. योहान १:१५सुमारे इ.स. ५

    योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ ”

  16. योहान १:१६सुमारे इ.स. ५

    त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.

  17. योहान १:१७सुमारे इ.स. ५

    कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे.

  18. योहान १:१८सुमारे इ.स. ५

    परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.

  19. योहान १:१९सुमारे इ.स. ५

    जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय.

  20. योहान १:२०सुमारे इ.स. ५

    तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.”

  21. योहान १:२१सुमारे इ.स. ५

    त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीयाह आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” “मग आपण संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.”

  22. योहान १:२२सुमारे इ.स. ५

    शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.”

  23. योहान १:२३सुमारे इ.स. ५

    यशायाह संदेष्ट्याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी आहे, जी म्हणते, “ ‘प्रभूचा मार्ग सरळ करा.’ ”

  24. योहान १:२४सुमारे इ.स. ५

    आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते,

  25. योहान १:२५सुमारे इ.स. ५

    त्यांनी प्रश्न विचारला, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीयाह नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?”