मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान २१:२२सुमारे इ.स. ३३

    त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.”

  2. योहान २१:२३सुमारे इ.स. ३३

    या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्‍यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?”

  3. योहान २१:२४सुमारे इ.स. ३३

    तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.

  4. योहान २१:२५सुमारे इ.स. ३३

    येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.