- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान २०:३सुमारे इ.स. ३३
मग पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले.
- योहान २०:४सुमारे इ.स. ३३
दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला.
- योहान २०:५सुमारे इ.स. ३३
त्याने डोकावून आत पाहिले, तेव्हा तिथे त्याने तागाच्या पट्ट्या पडलेल्या पाहिल्या, परंतु तो आत गेला नाही.
- योहान २०:६सुमारे इ.स. ३३
एवढ्यात शिमोन पेत्र त्याच्यामागून आला आणि सरळ कबरेच्या आत गेला. त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली,
- योहान २०:७सुमारे इ.स. ३३
त्याप्रमाणे जे कापड येशूंच्या डोक्याला गुंडाळून बांधले होते, ते कापड अजूनही त्याच ठिकाणी तागाच्या वस्त्रापासून वेगळे पडलेले होते असे त्याने पाहिले.
- योहान २०:८सुमारे इ.स. ३३
शेवटी दुसरा शिष्य, जो प्रथम कबरेजवळ पोहोचला होता, तोही आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
- योहान २०:९सुमारे इ.स. ३३
कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता.
- योहान २०:१०सुमारे इ.स. ३३
नंतर शिष्य एकत्र जिथे राहत होते तिथे ते परत गेले.
- योहान २०:११सुमारे इ.स. ३३
परंतु मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली. ती रडत असताना, तिने ओणवून कबरेच्या आत डोकावून पाहिले.
- योहान २०:१२सुमारे इ.स. ३३
आणि तिला, जिथे येशूंचे शरीर ठेवले होते तिथे, एक उशाशी व दुसरा पायथ्याशी शुभ्र झगा परिधान केलेले दोन देवदूत दिसले.
- योहान २०:१३सुमारे इ.स. ३३
त्यांनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस?” तिने उत्तर दिले, “कारण त्यांनी माझ्या प्रभूला काढून नेले आहे,” आणि “त्यांनी त्यांचे शरीर कुठे ठेवले आहे, हे मला माहीत नाही.”
- योहान २०:१४सुमारे इ.स. ३३
असे असताना, तिने मागे वळून पाहिले, तेव्हा येशू तिथे उभे होते, पण ते येशू आहेत हे तिने ओळखले नाही.
- योहान २०:१५सुमारे इ.स. ३३
येशूंनी तिला विचारले, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाचा शोध करत आहेस?” तो माळी असावा, असे समजून ती म्हणाली, “महाराज, तुम्ही त्यांना नेले असेल, तर तुम्ही कुठे ठेवले ते मला सांगा, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन.”
- योहान २०:१६सुमारे इ.स. ३३
येशू तिला म्हणाले, “मरीये.” त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली “रब्बूनी!” म्हणजे “गुरुजी.”
- योहान २०:१७सुमारे इ.स. ३३
येशू म्हणाले, “मला स्पर्श करू नको, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ”
- योहान २०:१८सुमारे इ.स. ३३
मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: “मी प्रभूला पाहिले आहे!” ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.
- योहान २०:१९सुमारे इ.स. ३३
आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”
- योहान २०:२०सुमारे इ.स. ३३
असे बोलल्यावर, त्यांनी आपले हात व आपली कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना अतिशय आनंद झाला.
- योहान २०:२१सुमारे इ.स. ३३
पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.”
- योहान २०:२२सुमारे इ.स. ३३
आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
- योहान २०:२३सुमारे इ.स. ३३
तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल; पण जर तुम्ही क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.”
- योहान २०:२४सुमारे इ.स. ३३
येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता.
- योहान २०:२५सुमारे इ.स. ३३
इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”
- योहान २०:२६सुमारे इ.स. ३३
एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”
- योहान २०:२७सुमारे इ.स. ३३
नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.”