मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान १८:३५सुमारे इ.स. ३३

    तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?”

  2. योहान १८:३६सुमारे इ.स. ३३

    मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्‍यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्‍या ठिकाणचे आहे.”

  3. योहान १८:३७सुमारे इ.स. ३३

    यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.”

  4. योहान १८:३८सुमारे इ.स. ३३

    पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही.

  5. योहान १८:३९सुमारे इ.स. ३३

    परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?”

  6. योहान १८:४०सुमारे इ.स. ३३

    ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.

  7. योहान १९:१सुमारे इ.स. ३३

    मग पिलाताने येशूंना फटके मारविले.

  8. योहान १९:२सुमारे इ.स. ३३

    सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला.

  9. योहान १९:३सुमारे इ.स. ३३

    ते त्यांच्याकडे वारंवार जाऊन म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर चापटा मारल्या.

  10. योहान १९:४सुमारे इ.स. ३३

    मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.”

  11. योहान १९:५सुमारे इ.स. ३३

    येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”

  12. योहान १९:६सुमारे इ.स. ३३

    येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!” परंतु पिलाताने उत्तर दिले, “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि त्याला क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टीने पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही.”

  13. योहान १९:७सुमारे इ.स. ३३

    तेव्हा यहूदी अधिकार्‍यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.”

  14. योहान १९:८सुमारे इ.स. ३३

    हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला.

  15. योहान १९:९सुमारे इ.स. ३३

    आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कुठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही.

  16. योहान १९:१०सुमारे इ.स. ३३

    पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?”

  17. योहान १९:११सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू उत्तरले, “जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.”

  18. योहान १९:१२सुमारे इ.स. ३३

    तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”

  19. योहान १९:१३सुमारे इ.स. ३३

    हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरामी भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो न्यायासनावर बसला

  20. योहान १९:१४सुमारे इ.स. ३३

    तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.

  21. योहान १९:१५सुमारे इ.स. ३३

    पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.”

  22. योहान १९:१६सुमारे इ.स. ३३

    शेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.

  23. योहान १९:१७सुमारे इ.स. ३३

    मग आपला स्वतःचा क्रूस वाहवून, ते कवटी म्हटलेल्या जागी आले, ज्याला अरामी भाषेमध्ये गोलगोथा म्हणतात.

  24. योहान १९:१८सुमारे इ.स. ३३

    तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले.

  25. योहान १९:१९सुमारे इ.स. ३३

    पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.