Skip to content

Genealogy बद्दल बायबलमधील वचने

114 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला.

  2. पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले.

  3. हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.

  4. लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.

  5. आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.

  6. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला.

  7. लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

  8. शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.

  9. अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  10. अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.

  11. शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  12. जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.

  13. आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  14. एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.

  15. पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  16. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.

  17. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  18. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  19. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  20. सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.

  21. नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  22. नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.

  23. तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  24. तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

  25. तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.