Skip to content

Creation Era

Creation & The Fall

God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.

138 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १:१सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली.

  2. उत्पत्ती १:२सुमारे इ.स.पू. ४००४

    आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.

  3. उत्पत्ती १:३सुमारे इ.स.पू. ४००४

    नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.

  4. उत्पत्ती १:४सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला.

  5. उत्पत्ती १:५सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.

  6. उत्पत्ती १:६सुमारे इ.स.पू. ४००४

    पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.”

  7. उत्पत्ती १:७सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले.

  8. उत्पत्ती १:८सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने अंतराळास “आकाश” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस.

  9. उत्पत्ती १:९सुमारे इ.स.पू. ४००४

    नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले.

  10. उत्पत्ती १:१०सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे.

  11. उत्पत्ती १:११सुमारे इ.स.पू. ४००४

    मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले.

  12. उत्पत्ती १:१२सुमारे इ.स.पू. ४००४

    भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  13. उत्पत्ती १:१३सुमारे इ.स.पू. ४००४

    आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस.

  14. उत्पत्ती १:१४सुमारे इ.स.पू. ४००४

    त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

  15. उत्पत्ती १:१५सुमारे इ.स.पू. ४००४

    पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या ज्योती आकाशमंडळात दीप होवोत” आणि तसे घडून आले.

  16. उत्पत्ती १:१६सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले.

  17. उत्पत्ती १:१७सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या,

  18. उत्पत्ती १:१८सुमारे इ.स.पू. ४००४

    दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  19. उत्पत्ती १:१९सुमारे इ.स.पू. ४००४

    आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस.

  20. उत्पत्ती १:२०सुमारे इ.स.पू. ४००४

    आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.”

  21. उत्पत्ती १:२१सुमारे इ.स.पू. ४००४

    सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  22. उत्पत्ती १:२२सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.”

  23. उत्पत्ती १:२३सुमारे इ.स.पू. ४००४

    आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.

  24. उत्पत्ती १:२४सुमारे इ.स.पू. ४००४

    मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले.

  25. उत्पत्ती १:२५सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे.