Skip to content

Enoch

10 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Henoch

Enoch चा उल्लेख असलेली वचने

  1. यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.

  2. हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  3. हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.

  4. मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  5. हनोख एकंदर 365 वर्षे जगला.

  6. हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.

  7. हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.

  8. तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,

  9. विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.” हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाले होते की ते हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होते.

  10. आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत