Skip to content

Antediluvians बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता.

  2. हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले.

  3. हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,

  4. आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.

  5. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला.

  6. लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

  7. पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले.

  8. आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या.

  9. म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”

  10. तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.

  11. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे.

  12. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर.

  13. मी पृथ्वी महापुराने भरून टाकणार आहे आणि आकाशाखाली ज्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक सजीव प्राण्याचा मी नाश करणार आहे. पृथ्वीवर जे काही आहे त्याचा नाश होईल.

  14. परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील.

  15. तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये.

  16. प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील.

  17. आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.”

  18. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.

  19. पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता.

  20. कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला.

  21. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.

  22. पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते त्यावर अजून किती काळ तू चालशील?

  23. ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्‍या आधी उठविले गेले, त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.

  24. ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’

  25. जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल.