मुख्य मजकुरावर जा

Antediluvians बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते.

  2. आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल.

  3. “जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल.

  4. नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. नंतर जलप्रलय आला व त्या सर्वांचा नाश झाला.

  5. नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.

  6. जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला

  7. ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते.

  8. आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत

  9. सर्वांचा न्याय करण्यासाठी आणि जे सर्व अनीतिमान कृत्ये त्यांनी अनीतीमध्ये केली आणि अनीतिमान पाप्यांनी त्यांच्याविरुद्ध जे सर्व विद्रोही शब्द बोलले त्या सर्वांना तो दोषी ठरवेल.”