Antediluvians बद्दल बायबलमधील वचने: Occupations of
Occupations of बद्दल वचने
नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता.
हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले.
आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्या व तंबू ठोकून राहणार्या लोकांचा मूळ पुरुष झाला.
त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्यांचा मूळ पुरुष झाला.
लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.