Skip to content

Creation Era

Creation & The Fall

God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.

138 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १:२६सुमारे इ.स.पू. ४००४

    मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्‍या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.”

  2. उत्पत्ती १:२७सुमारे इ.स.पू. ४००४

    याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.

  3. उत्पत्ती १:२८सुमारे इ.स.पू. ४००४

    मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्‍या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.”

  4. उत्पत्ती १:२९सुमारे इ.स.पू. ४००४

    मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील.

  5. उत्पत्ती १:३०सुमारे इ.स.पू. ४००४

    त्याप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, तसेच जमिनीवर सरपटत जाणारा, जीवनाचा श्वास असलेला प्रत्येक प्राणी—यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे” आणि तसे घडून आले.

  6. उत्पत्ती १:३१सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती अतिशय चांगली होती आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा सहावा दिवस.

  7. उत्पत्ती २:१सुमारे इ.स.पू. ४००४

    अशा रीतीने आकाश, पृथ्वी व त्यातील सर्वांची निर्मिती पूर्ण झाली.

  8. उत्पत्ती २:२सुमारे इ.स.पू. ४००४

    परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली.

  9. उत्पत्ती २:३सुमारे इ.स.पू. ४००४

    सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.

  10. उत्पत्ती २:४सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली.

  11. उत्पत्ती २:५सुमारे इ.स.पू. ४००४

    जमिनीवर अद्याप वनस्पती उगवली नव्हती, कारण याहवेह परमेश्वराने अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी मनुष्य नव्हता.

  12. उत्पत्ती २:६सुमारे इ.स.पू. ४००४

    मात्र जमिनीवरून धुके वर जात असे आणि त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे.

  13. उत्पत्ती २:७सुमारे इ.स.पू. ४००४

    मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.

  14. उत्पत्ती २:८सुमारे इ.स.पू. ४००४

    नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.

  15. उत्पत्ती २:९सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले.

  16. उत्पत्ती २:१०सुमारे इ.स.पू. ४००४

    बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या

  17. उत्पत्ती २:११सुमारे इ.स.पू. ४००४

    पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते.

  18. उत्पत्ती २:१२सुमारे इ.स.पू. ४००४

    त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती व गोमेद रत्नेही सापडतात.

  19. उत्पत्ती २:१३सुमारे इ.स.पू. ४००४

    दुसर्‍या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते.

  20. उत्पत्ती २:१४सुमारे इ.स.पू. ४००४

    तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.

  21. उत्पत्ती २:१५सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले.

  22. उत्पत्ती २:१६सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा;

  23. उत्पत्ती २:१७सुमारे इ.स.पू. ४००४

    परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

  24. उत्पत्ती २:१८सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.”

  25. उत्पत्ती २:१९सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने भूमीपासून प्रत्येक जातीचे वन्यपशू, आकाशातील सर्व पक्षी निर्माण केले. त्यांना मानव कोणती नावे देतो हे पाहण्याकरिता त्याच्याकडे आणले; आणि त्याने जी नावे दिली तीच त्यांची नावे पडली.