Skip to content

Creation Era

Creation & The Fall

God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.

138 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३:२०सुमारे इ.स.पू. ४००४

    आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.

  2. उत्पत्ती ३:२१सुमारे इ.स.पू. ४००४

    याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली.

  3. उत्पत्ती ३:२२सुमारे इ.स.पू. ४००४

    नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.”

  4. उत्पत्ती ३:२३सुमारे इ.स.पू. ४००४

    म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले.

  5. उत्पत्ती ३:२४सुमारे इ.स.पू. ४००४

    अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

  6. उत्पत्ती ४:१सुमारे इ.स.पू. ४००३

    मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.”

  7. उत्पत्ती ४:२सुमारे इ.स.पू. ४००३

    नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता.

  8. उत्पत्ती ४:३सुमारे इ.स.पू. ४००३

    हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले.

  9. उत्पत्ती ४:४सुमारे इ.स.पू. ४००३

    हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,

  10. उत्पत्ती ४:५सुमारे इ.स.पू. ४००३

    पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला.

  11. उत्पत्ती ४:६सुमारे इ.स.पू. ४००३

    याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्‍यावर निराशा का दिसते?

  12. उत्पत्ती ४:७सुमारे इ.स.पू. ४००३

    तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”

  13. उत्पत्ती ४:८सुमारे इ.स.पू. ४००३

    एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला.

  14. उत्पत्ती ४:९सुमारे इ.स.पू. ४००३

    मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”

  15. उत्पत्ती ४:१०सुमारे इ.स.पू. ४००३

    याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे.

  16. उत्पत्ती ४:११सुमारे इ.स.पू. ४००३

    ज्या भूमीने तुझ्या भावाचे रक्त स्वीकारण्यास आपले मुख उघडले आहे, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे आणि तू शापित आहेस.

  17. उत्पत्ती ४:१२सुमारे इ.स.पू. ४००३

    त्या भूमीवर तू कष्ट केलेस तरी ती तुला उपज देणार नाही. तू बेचैन असा पृथ्वीवर भटकशील.”

  18. उत्पत्ती ४:१३सुमारे इ.स.पू. ४००३

    काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

  19. उत्पत्ती ४:१४सुमारे इ.स.पू. ४००३

    कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”

  20. उत्पत्ती ४:१५सुमारे इ.स.पू. ४००३

    यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली.

  21. उत्पत्ती ४:१६सुमारे इ.स.पू. ४००३

    मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला.

  22. उत्पत्ती ४:१७सुमारे इ.स.पू. ४००३

    पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले.

  23. उत्पत्ती ४:१८सुमारे इ.स.पू. ४००३

    हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.

  24. उत्पत्ती ४:१९सुमारे इ.स.पू. ४००३

    लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.

  25. उत्पत्ती ४:२०सुमारे इ.स.पू. ४००३

    आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.