Skip to content

Creation Era

Creation & The Fall

God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.

138 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४:२१सुमारे इ.स.पू. ४००३

    त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला.

  2. उत्पत्ती ४:२२सुमारे इ.स.पू. ४००३

    लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

  3. उत्पत्ती ४:२३सुमारे इ.स.पू. ४००३

    एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला, आदाह व सिल्ला माझे ऐका, “लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका. एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले. पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे.

  4. उत्पत्ती ४:२४सुमारे इ.स.पू. ४००३

    जर काईनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.”

  5. उत्पत्ती ४:२५सुमारे इ.स.पू. ४००३

    आदामाने हव्वेशी पुन्हा प्रीती संबंध केला आणि हव्वेने पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शेथ असे ठेवले, कारण ती म्हणाली, “काईनाने ठार केलेल्या हाबेल या माझ्या पुत्राच्या जागी परमेश्वराने मला दुसरा पुत्र दिला आहे.”

  6. उत्पत्ती ४:२६सुमारे इ.स.पू. ३७६९

    शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला.

  7. ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.

  8. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.

  9. उत्पत्ती ५:३सुमारे इ.स.पू. ३८७४

    आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.

  10. उत्पत्ती ५:४सुमारे इ.स.पू. ३८७४

    शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  11. उत्पत्ती ५:५सुमारे इ.स.पू. ३०७४

    आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  12. उत्पत्ती ५:६सुमारे इ.स.पू. ३७६९

    शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला.

  13. उत्पत्ती ५:७सुमारे इ.स.पू. ३७६९

    अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  14. उत्पत्ती ५:८सुमारे इ.स.पू. २९६२

    शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  15. उत्पत्ती ५:९सुमारे इ.स.पू. ३६७९

    अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.

  16. उत्पत्ती ५:१०सुमारे इ.स.पू. ३६७९

    केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  17. उत्पत्ती ५:११सुमारे इ.स.पू. २८६४

    अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  18. उत्पत्ती ५:१२सुमारे इ.स.पू. ३६०९

    केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.

  19. उत्पत्ती ५:१३सुमारे इ.स.पू. ३६०९

    महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  20. उत्पत्ती ५:१४सुमारे इ.स.पू. २७६९

    केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  21. उत्पत्ती ५:१५सुमारे इ.स.पू. ३५४४

    महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.

  22. उत्पत्ती ५:१६सुमारे इ.स.पू. ३५४४

    यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  23. उत्पत्ती ५:१७सुमारे इ.स.पू. २७१४

    महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  24. उत्पत्ती ५:१८सुमारे इ.स.पू. ३३८२

    यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.

  25. उत्पत्ती ५:१९सुमारे इ.स.पू. ३३८२

    हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.