- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Creation Era
Creation & The Fall
God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २:२०सुमारे इ.स.पू. ४००४
याप्रकारे मानवाने सर्व पाळीव प्राण्यांना, आकाशातील पक्ष्यांना आणि जमिनीवरील सर्व पशूंना नावे दिली. परंतु आदामाला योग्य असा मदतनीस त्यांच्यामध्ये नव्हता.
- उत्पत्ती २:२१सुमारे इ.स.पू. ४००४
नंतर याहवेह परमेश्वराने मानवाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपेत असताना याहवेह परमेश्वराने त्याची एक फासळी काढली आणि ती जागा त्यांनी मांसाने भरून काढली.
- उत्पत्ती २:२२सुमारे इ.स.पू. ४००४
याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले.
- उत्पत्ती २:२३सुमारे इ.स.पू. ४००४
तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.”
- उत्पत्ती २:२४सुमारे इ.स.पू. ४००४
या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.
- उत्पत्ती २:२५सुमारे इ.स.पू. ४००४
आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती.
- उत्पत्ती ३:१सुमारे इ.स.पू. ४००४
आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?”
- उत्पत्ती ३:२सुमारे इ.स.पू. ४००४
स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे.
- उत्पत्ती ३:३सुमारे इ.स.पू. ४००४
पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”
- उत्पत्ती ३:४सुमारे इ.स.पू. ४००४
पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही,
- उत्पत्ती ३:५सुमारे इ.स.पू. ४००४
कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”
- उत्पत्ती ३:६सुमारे इ.स.पू. ४००४
जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.
- उत्पत्ती ३:७सुमारे इ.स.पू. ४००४
पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.
- उत्पत्ती ३:८सुमारे इ.स.पू. ४००४
सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.
- उत्पत्ती ३:९सुमारे इ.स.पू. ४००४
परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”
- उत्पत्ती ३:१०सुमारे इ.स.पू. ४००४
आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”
- उत्पत्ती ३:११सुमारे इ.स.पू. ४००४
याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
- उत्पत्ती ३:१२सुमारे इ.स.पू. ४००४
त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”
- उत्पत्ती ३:१३सुमारे इ.स.पू. ४००४
तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”
- उत्पत्ती ३:१४सुमारे इ.स.पू. ४००४
याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! तू तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस माती खाशील.
- उत्पत्ती ३:१५सुमारे इ.स.पू. ४००४
तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”
- उत्पत्ती ३:१६सुमारे इ.स.पू. ४००४
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”
- उत्पत्ती ३:१७सुमारे इ.स.पू. ४००४
नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.
- उत्पत्ती ३:१८सुमारे इ.स.पू. ४००४
भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.
- उत्पत्ती ३:१९सुमारे इ.स.पू. ४००४
ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”