मुख्य मजकुरावर जा

Genealogy बद्दल बायबलमधील वचने

114 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

  2. अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.

  3. सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.

  4. मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.

  5. तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.

  6. पेरेसाची वंशावळ अशी: पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,

  7. हेस्रोन हा रामचा पिता, राम हा अम्मीनादाबचा पिता,

  8. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता, नहशोन हा सल्मोन चा पिता,

  9. सल्मोन हा बवाजचा पिता, बवाज हा ओबेदचा पिता,

  10. ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.

  11. आदाम, शेथ, अनोश,

  12. केनान, महलालेल, यारेद,

  13. हनोख, मथुशेलह, लामेख, नोआह.

  14. नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.

  15. याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.

  16. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  17. यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.

  18. हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.

  19. कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.

  20. कूश निम्रोदचा पिता होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.

  21. इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

  22. पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.

  23. कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ,

  24. यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

  25. हिव्वी, आर्की, सीनी,