Persia
34.7900, 48.5100 गूगल नकाशावर पाहा
Persia चा उल्लेख असलेली वचने
तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले.
यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.
“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”
यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.
“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे.
कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या.
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”
त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले.
अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षापर्यंत स्थगित झाले.
म्हणून यहूदी पुढार्यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले.
या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्याहाचा पुत्र होता. अजर्याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.
आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.
त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व अधिकार्यांना तिथे भरविलेल्या महोत्सवाचे राजवाड्यात आमंत्रण दिले. या प्रसंगासाठी पर्शिया व मेदियातील लष्करी अधिकारी, सरदार आणि त्या प्रांतातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.
शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती.
आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही.
मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय?
“ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.
पर्शिया, कूश आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील.
जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत.
पर्शियाचा राजा कोरेश च्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.
परंतु पर्शिया राज्याच्या राजपुत्राने माझी वाट एकवीस दिवस अडविली. नंतर मिखाएल, स्वर्गातील राजपुत्रांपैकी एक, माझ्या साहाय्यासाठी आला, कारण पर्शियाच्या राजाकडे मला अडविण्यात आले होते.
तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? फार लवकर, मी पर्शियाच्या राजपुत्राशी लढायला परत येईन आणि मी निघून गेल्यावर ग्रीसचा राजपुत्र येईल;
“आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.