Skip to content

Artaxerxes

10 वचने

Artaxerxes चा उल्लेख असलेली वचने

  1. म्हणून यहूदी पुढार्‍यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्‍याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले.

  2. या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.

  3. काही इस्राएली लोक व तसेच याजक, लेवी, गायक, द्वारपाल व मंदिरातील सेवक यांनीही त्याच्याबरोबर प्रवास केला व ते अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमला पोहोचले.

  4. ही पत्राची प्रत आहे जी अर्तहशश्त राजाने नियमशास्त्राचा शिक्षक आणि इस्राएलसाठी याहवेहच्या आज्ञा आणि नियमांचा अभ्यासक एज्रा याजकाला दिली होती:

  5. राजांचा राजा, जो अर्तहशश्त याजकडून, स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक एज्रा याजक यास: शुभेच्छा.

  6. आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे—

  7. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:

  8. पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो.

  9. याशिवाय, अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंतच्या—बारा वर्षांच्या संपूर्ण कालावधीत मी यहूदीयाचा राज्यपाल असताना, माझ्या बंधूंनी आणि मी राज्यपालास नेमून दिलेल्या अन्नाचा वाटा घेतला नाही.

  10. हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली,