Skip to content

Months बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

  2. नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली.

  3. आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.

  4. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.” याकोबाला तिथे राहून सुमारे एक महिना झाल्यानंतर,

  5. आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात.

  6. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  7. परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”

  8. याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता,

  9. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  10. इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्‍या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.

  11. चौथ्या वर्षी, सीव महिन्यात याहवेहच्या मंदिराचा पाया घातला गेला.

  12. अकराव्या वर्षी, आठव्या महिन्यात; म्हणजे बूल महिन्यात, त्याच्या तपशील व नमुन्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम संपले. शलोमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षे लागली.

  13. इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.

  14. पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते.

  15. तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.

  16. अहोही दोदय हा दुसर्‍या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  17. तिसर्‍या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  18. बेनाइयाह दावीदाच्या सैन्यातील पहिल्या तीस योद्ध्यापैकी एक व त्या तिसांचा अधिकारी होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद सैन्य तुकडीचा सेनापती होता.

  19. चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  20. पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  21. सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  22. सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  23. आठव्या महिन्याचा आठवा सेनापती जेरह कुळातील हुशाथी सिब्बखय होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  24. नवव्या महिन्याचा नववा सेनापती बिन्यामीन अनाथोथी अबिएजेर होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.

  25. दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती माहाराई, नटोफाथी जेरही होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.