- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Darius
Darius चा उल्लेख असलेली वचने
त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षापर्यंत स्थगित झाले.
पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.
फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता:
त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: दारयावेश महाराज, आपणास आमच्या शुभेच्छा!
म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा.
ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्या व मंदिराचा नाश करणार्या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.
फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली.
म्हणून यहूदी पुढार्यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी, अदार महिन्याच्या तिसऱ्या दिवशी हे काम पूर्ण झाले.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला:
हे सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे घडले.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले:
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले:
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्याहला याहवेहकडून संदेश मिळाला.