मुख्य मजकुरावर जा

Ahasuerus

29 वचने · 2 कुटुंब सदस्य

Ahasuerus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर जेव्हा अहश्वेरोश राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली.

  2. भारतापासून कूशपर्यंत पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश च्या कारकिर्दीत हे घडले:

  3. त्याकाळी राजा अहश्वेरोश शूशनच्या सिंहासनावर विराजमान होता.

  4. वश्ती राणीनेही अहश्वेरोश राजाच्या शाही महालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

  5. सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना—

  6. राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.”

  7. राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे.

  8. कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’

  9. “यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी.

  10. अहश्वेरोश राजाचा संताप शांत झाल्यानंतर त्याला वश्तीचे स्मरण झाले आणि तिने काय केले व त्याने तिच्याविरुद्ध कोणता कायदा बनविला हे कळून आले.

  11. अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई.

  12. तेव्हा एस्तेरला अहश्वेरोश राजाच्या महालात त्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या दहाव्या म्हणजे, तेबेथ महिन्यात नेण्यात आले.

  13. एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला.

  14. त्यानंतर अहश्वेरोश राजाने अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा बहुमान करून त्याची इतर प्रतिष्ठितांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून नेमणूक केली.

  15. परंतु मर्दखया कोणत्या समाजातून आला आहे हे कळल्यावर, एकट्या मर्दखयावर हात टाकण्याचा विचार त्याला कमीपणाचा वाटला. याउलट अहश्वेरोश राजाच्या संपूर्ण साम्राज्यातील मर्दखयाच्या समाजाच्या सर्व लोकांचा म्हणजे यहूद्यांचा नायनाट करण्याचा हामान मार्ग शोधू लागला.

  16. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार महिना निवडण्यात आला.

  17. आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही.

  18. नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्‍यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली.

  19. ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.

  20. तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”

  21. त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते.

  22. मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले.

  23. हे सर्व करण्यासाठी अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांसाठी एक दिवस म्हणजे बारावा म्हणजे अदार महिन्याचा तेरावा दिवस निवडण्यात आला.

  24. त्या शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपआपल्या शहरांमध्ये एकत्र आले. परंतु त्यांना कोणीही उपद्रव दिला नाही, कारण सर्व जातीच्या लोकांना यहूद्यांची धास्ती वाटू लागली होती.

  25. मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली.