Skip to content

Husband बद्दल बायबलमधील वचने

71 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.”

  2. या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.

  3. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  4. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली,

  5. जेणेकरून दुसर्‍या पुरुषाचे तिच्याशी लैंगिक संबंध असले आणि हे तिच्या पतीपासून गुपित असेल आणि तिची अशुद्धता उघडकीस आली नाही (कारण तिच्याविरुद्ध कोणीही साक्षीदार नाही आणि ती त्या कृत्यात पकडली गेली नाही),

  6. आणि जर तिच्या पतीला मत्सराची भावना झाली आणि तो आपल्या पत्नीवर संशय घेतो की ती अशुद्ध आहे—किंवा त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आणि ती जरी अशुद्ध नसली तरीही तो संशय घेतो—

  7. तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे.

  8. “ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे.

  9. मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी.

  10. नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे.

  11. मग याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे, “जर कोणी पुरुषाने तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत आणि तू आपल्या पतीशी विवाहित असताना निर्दोष असून वाकडे पाऊल टाकले नाही, तर या कडू पाण्यापासून मिळणारा शाप तुला अपाय न करो.

  12. परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस—

  13. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  14. शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

  15. “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे.

  16. ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.

  17. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  18. त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

  19. जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.

  20. पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

  21. “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा,

  22. किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

  23. तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ”

  24. एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  25. आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”