Skip to content

Vashti

10 वचने · 1 कुटुंब सदस्य

Vashti चा उल्लेख असलेली वचने

  1. वश्ती राणीनेही अहश्वेरोश राजाच्या शाही महालातील स्त्रियांना मेजवानी दिली.

  2. राणी वश्तीला मस्तकावर राजमुकुट घालून आपणाकडे आणण्यास सांगितले. हेतू हा की जमलेले सर्व लोक व प्रतिष्ठितांसमोर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करावे, कारण ती एक अतिशय सुंदर स्त्री होती.

  3. परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.

  4. राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.”

  5. राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे.

  6. कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’

  7. “यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी.

  8. अहश्वेरोश राजाचा संताप शांत झाल्यानंतर त्याला वश्तीचे स्मरण झाले आणि तिने काय केले व त्याने तिच्याविरुद्ध कोणता कायदा बनविला हे कळून आले.

  9. मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली.

  10. इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली, त्याने तिला इतर सर्व कुमारिकांपेक्षा जास्त पसंत केले, तो तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्या मस्तकांवर राणीचा राजमुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी एस्तेरला राणी केले.