Skip to content

Solomon

275 वचने · 27 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jedidiah

Solomon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,

  2. नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली;

  3. कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह असे ठेवले.

  4. परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही.

  5. तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही?

  6. तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो.

  7. दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’

  8. ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’

  9. त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोनला त्याने बोलाविले नाही.

  10. नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”

  11. परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही.

  12. याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.”

  13. राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.

  14. तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’

  15. याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”

  16. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.

  17. सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.”

  18. योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे.

  19. शिवाय, शलोमोनने राजासनावरील आपले स्थान घेतले आहे.

  20. तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले

  21. परंतु अदोनियाहने शलोमोनच्या भीतीने जाऊन वेदीवरील शिंगे धरून ठेवली.

  22. तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ”

  23. शलोमोनने उत्तर दिले, “जर तो स्वतःस योग्य असा सिद्ध करेल, तर त्याच्या डोक्यावरील एक केससुद्धा जमिनीवर पडणार नाही; पण त्याच्या ठायी दुष्टाई आढळली, तर तो मरण पावेल.”

  24. तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले आणि अदोनियाहने येऊन शलोमोन राजास मुजरा केला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.”

  25. जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या.