Tyre
हे नावानेही ओळखले जाते: Tyrus
33.2700, 35.1900 गूगल नकाशावर पाहा
Tyre चा उल्लेख असलेली वचने
नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते,
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला.
नंतर ते सोरच्या किल्ल्याकडे आणि हिव्वी व कनानी यांच्या सर्व नगरांकडे व शेवटी ते यहूदीयाच्या नेगेवप्रांतातील बेअर-शेबापर्यंत गेले.
त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.
शलोमोन राजाने सोर येथून हीरामला बोलावून घेतले.
त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.
शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते.
परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही.
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले.
शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे.
सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”
त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.
सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील.
गबाल, अम्मोन, व अमालेक, पलेशेथ आणि सोरचे निवासी.
“मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”
सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.
जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील.
सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत?
त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल:
सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.
तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;
मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,
कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.
“मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’
यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन.