मुख्य मजकुरावर जा

Naphtali

49 वचने · 18 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Nephthalim

"Naphtali" साठी शोधा

Naphtali चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राहेलने त्याचे नाव नफताली असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”

  2. राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र: दान व नफताली हे होते.

  3. नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.

  4. “नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.

  5. दान आणि नफताली; गाद व आशेर.

  6. नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”

  7. नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  8. नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.

  9. नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.

  10. बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.

  11. आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता.

  12. नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी;

  13. नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;

  14. ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.

  15. नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”

  16. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  17. नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”

  18. नफतालीचा संपूर्ण प्रदेश, एफ्राईम आणि मनश्शेह यांचे प्रदेश, त्यांच्या पलीकडे भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेला तो यहूदीयाचा सर्व प्रदेश,

  19. सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली.

  20. ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.

  21. तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.

  22. गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली.

  23. नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.

  24. नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.

  25. तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.