Skip to content

Holy Land बद्दल बायबलमधील वचने

108 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.

  2. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  3. तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.

  4. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.

  5. सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.

  6. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  7. आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.

  8. याहवेह मोशेला म्हणाले,

  9. “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.”

  10. म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते.

  11. त्यांची नावे ही आहेत: रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा;

  12. शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;

  13. यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  14. इस्साखार गोत्रातील योसेफाचा पुत्र इगाल;

  15. एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा;

  16. बिन्यामीन गोत्रातील राफूचा पुत्र पालती;

  17. जबुलून गोत्रातील सोदीचा पुत्र गाद्दीयेल;

  18. मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी;

  19. दान गोत्रातील गमल्लीचा पुत्र अम्मीएल;

  20. आशेर गोत्रातील मिखाएलचा पुत्र सेथूर;

  21. नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी;

  22. गाद गोत्रातील माकीचा पुत्र गऊवेल.

  23. देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.)

  24. जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा.

  25. आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा.