मुख्य मजकुरावर जा

Holy Land बद्दल बायबलमधील वचने

108 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल.

  2. नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’

  3. याहवेह मोशेला म्हणाले,

  4. “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.

  5. आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा.

  6. “ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  7. शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;

  8. बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;

  9. दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता.

  10. योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता.

  11. योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता.

  12. जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता.

  13. इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता.

  14. आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता.

  15. नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”

  16. इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.

  17. कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्‍यांमधून वाहत आहेत;

  18. गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे;

  19. या देशात भाकरीची उणीव भासणार नाही आणि कशाचीही कमतरता राहणार नाही; तेथील दगड लोहयुक्त आहेत व डोंगरांमधून तांबे खणून काढता येईल.

  20. कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.

  21. परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो.

  22. याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्या भूमीची काळजी घेतात; वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत याहवेह तुमच्या परमेश्वराची नजर सतत त्या देशावर असते.

  23. मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल—

  24. तर याहवेह या सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील आणि तुमच्यापेक्षा कितीही मोठी आणि बलवान राष्ट्र असोत, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात घ्याल.

  25. तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल.