मुख्य मजकुरावर जा

Holy Land बद्दल बायबलमधील वचने

108 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकणार नाही. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाविषयी तेथील लोकात ते भय आणि दहशत निर्माण करतील.

  2. इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.”

  3. मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.

  4. आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्‍यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश,

  5. अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे.

  6. आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान;

  7. म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले.

  8. परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.

  9. परंतु लेवीच्या गोत्रास त्याने कोणतेही वतन दिले नाही, कारण याहवेहने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, इस्राएलचे परमेश्वर याहवेहना वाहिलेली अन्नार्पणे हे त्यांचे वतनभाग आहेत.

  10. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  11. त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता;

  12. बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता.

  13. बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता);

  14. बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता);

  15. अहीलुदचा पुत्र बाअनाकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;

  16. बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती);

  17. इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम.

  18. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

  19. हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;

  20. पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता;

  21. एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.

  22. उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.

  23. शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली.

  24. आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले.

  25. त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.