मुख्य मजकुरावर जा

Manasseh

109 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Manasses

Manasseh चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे.

  2. योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले.

  3. काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला.

  4. “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

  5. मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले.

  6. परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता.

  7. त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.

  8. त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.

  9. आणि योसेफाने त्याचा पुत्र एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली. तसेच मनश्शेहचा पुत्र माखीरला जन्मतः त्याच्या मांडीवर ठेवण्यात आले.

  10. योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;

  11. मनश्शेहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  12. मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.

  13. मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.

  14. आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.

  15. पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता,

  16. मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी;

  17. योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:

  18. मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.

  19. ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.

  20. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या

  21. तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.

  22. मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.

  23. म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.

  24. मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.

  25. कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे.