मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Manasseh बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  2. कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

  3. परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  4. कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.

  5. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  6. आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.

  7. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  8. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  9. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  10. पापार्पणासाठी एक बोकड;

  11. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे.

  12. मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.

  13. हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;

  14. अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ;

  15. शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.

  16. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)

  17. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या

  18. आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या,

  19. “आमचे पिता रानात मरण पावले. ते कोरहाच्या अनुयायांपैकी नव्हते, ज्यांनी एकत्र येऊन याहवेहविरुद्ध बंड केले, परंतु ते आपल्याच पापामुळे मरण पावले आणि त्यांना पुत्र नव्हते.

  20. त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.”

  21. तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला,

  22. आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  23. “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.

  24. मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.

  25. म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.