Skip to content

Zelophehad

9 वचने · 6 कुटुंब सदस्य

Zelophehad चा उल्लेख असलेली वचने

  1. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)

  2. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या

  3. “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.

  4. ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे.

  5. सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.

  6. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले.

  7. सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला.

  8. मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.

  9. माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.