मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Manasseh बद्दल बायबलमधील वचने

56 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.

  2. आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.

  3. तो योसेफाबद्दल म्हणाला: “याहवेह स्वर्गातील मौल्यवान दवाने, आणि पृथ्वीच्या खोलात असलेल्या जलाने त्याच्या भूमीला आशीर्वादित करोत;

  4. सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो;

  5. प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी आणि सनातन डोंगरातून मिळणार्‍या निवडक फळांनी भरून जावो;

  6. जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट, आणि जळत्या झुडूपातून बोलणार्‍या त्या प्रभूच्या कृपादृष्टीने तो समृद्ध होवो. योसेफाच्या व त्याच्या वंशजाच्या मस्तकावर हे सर्व आशीर्वाद येवोत, जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता.

  7. प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे; त्याची शिंगे रानबैलाची शिंगे आहेत, त्या शिंगानी तो राष्ट्रांना, पृथ्वीच्या दिगंती असलेल्यांना देखील भोसकतो. एफ्राईमाचे लाखो वंशज आणि मनश्शेहचे हजारो वंशज असे आहेत.”

  8. मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले:

  9. त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  10. अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).

  11. योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते.

  12. हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.

  13. मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती.

  14. त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले.

  15. यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले,

  16. कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता.

  17. मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते.

  18. (मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)

  19. ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते.

  20. दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.

  21. इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

  22. आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”)

  23. दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते.

  24. ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते.

  25. मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातले लोक दावीदाला राजा होण्यास मदत करण्यासाठी तातडीने पाठविण्यात आलेल्या सैन्यात होते 18,000;