Skip to content

Mahanaim

13 verses

32.2100, 35.6300 गूगल नकाशावर पाहा

Mahanaim चा उल्लेख असलेली वचने

  1. जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले.

  2. आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;

  3. त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  4. गादच्या गोत्राकडून: गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,

  5. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  6. नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.

  7. अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले.

  8. नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला.

  9. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  10. बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता.

  11. “आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.

  12. इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम.

  13. आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,