Skip to content

The Amorites बद्दल बायबलमधील वचने

59 वचने · 29 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:

  2. “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”

  3. परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला.

  4. परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.

  5. याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली.

  6. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

  7. म्हणूनच कवी म्हणतात: “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.

  8. “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.

  9. हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.

  10. “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, आम्ही त्यांचा नाश केला आहे.”

  11. याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले.

  12. मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले.

  13. नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.

  14. याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

  15. तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.

  16. तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,

  17. तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.

  18. त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.

  19. ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”

  20. तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”

  21. ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”

  22. त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे.

  23. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्‍यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे.

  24. म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’

  25. आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे.