Skip to content

Arnon

12 verses

31.4200, 35.6700 गूगल नकाशावर पाहा

Arnon चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे.

  2. यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: “…सूफाहतील वाहेब व आर्णोनाचे ओहोळ

  3. परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.

  4. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

  5. “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.

  6. बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला.

  7. अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”

  8. “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.

  9. आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्‍यांचा सर्व प्रदेश काबीज केला.

  10. तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही?

  11. घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.

  12. मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.