Skip to content

Moabites बद्दल बायबलमधील वचने

122 वचने · 56 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला.

  2. एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;

  3. नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे.

  4. हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

  5. “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.

  6. हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.

  7. “पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, आम्ही त्यांचा नाश केला आहे.”

  8. इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला.

  9. मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,

  10. तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’

  11. “मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.

  12. इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले,

  13. त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले.

  14. अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला.

  15. तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.”

  16. (एमी लोक त्या भागात राहात होते—बलवान व बहुसंख्य आणि अनाकी लोकांसारखे उंच असे होते.

  17. एमी व अनाकी या दोन्हीही जमातीस पुष्कळदा रेफाईम असेही म्हणत, पण मोआबी मात्र त्यांना एमीच म्हणत.

  18. सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.”

  19. तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये.

  20. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.

  21. म्हणून तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी तहाची मैत्री करण्याचा कधीही प्रयत्न करू नये.

  22. जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले.

  23. म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही.

  24. तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले.

  25. “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.