Skip to content

Moabites बद्दल बायबलमधील वचने

122 वचने · 56 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.

  2. याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.

  3. परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”

  4. याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.

  5. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  6. “ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.

  7. तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.

  8. कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.

  9. “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  10. “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?

  11. पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ यांनाही शिक्षा मिळाली आहे.

  12. दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,

  13. किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन

  14. करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.

  15. “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.

  16. इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?

  17. “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

  18. हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.

  19. “परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.

  20. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”

  21. म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन.

  22. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”