Edom
हे नावानेही ओळखले जाते: Idumea, Syria
30.7300, 35.6000 गूगल नकाशावर पाहा
Edom चा उल्लेख असलेली वचने
याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;
कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.
एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.
दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.
इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:
बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.
मग्दीएल व ईराम.
एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;
मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.
पण एदोम म्हणाला: “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”
त्यांनी पुन्हा उत्तर दिले: “तुम्ही जाऊ शकत नाही.” तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला.
एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले.
एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,
नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले;
एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.
त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला.
“ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी,
यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.
दक्षिण भागाची नगरे यहूदाह गोत्राची जी नेगेव प्रांताकडे एदोमाच्या सीमेजवळ होती: कबसेल, एदर, यागूर,
“जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.
तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले.
“नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.
इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.
अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.
त्याने एदोमात सर्वठिकाणी ठाणे बसविले आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथे कुठे गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.