मुख्य मजकुरावर जा

Edom

80 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Idumea, Syria

30.7300, 35.6000 गूगल नकाशावर पाहा

Edom चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.

  2. यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,” ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.

  3. ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”

  4. याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय?

  5. एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.