मुख्य मजकुरावर जा

Edom

80 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Idumea, Syria

30.7300, 35.6000 गूगल नकाशावर पाहा

Edom चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली.

  2. नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले.

  3. काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते.

  4. एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले.

  5. त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.

  6. यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.”

  7. त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदीयाचा राजा आणि एदोमाचा राजा यांच्यासोबत निघाला. सात दिवसाच्या फेरीनंतर, सैनिकांजवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांसाठी पाणी उरले नाही.

  8. यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले.

  9. दुसर्‍या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली.

  10. आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

  11. यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.

  12. तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.

  13. खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?”

  14. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  15. हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  16. मग्दीएल व ईराम.

  17. दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.

  18. त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  19. नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला.

  20. काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी).

  21. परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  23. मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”

  24. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  25. एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,