मुख्य मजकुरावर जा

Moabites बद्दल बायबलमधील वचने: Conquered by Israel and Judah

3 वचने · 56 पैलू

Conquered by Israel and Judah बद्दल वचने

  1. पण जेव्हा मोआबी लोक इस्राएलांच्या छावणीकडे आले न आले तोच इस्राएलचे सैन्य उठले आणि ते पळेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले आणि त्वेषाने तुटून पडले व त्यांचा संहार करू लागले; आणि मोआबाचे सैन्य इस्राएलांपासून पळू लागले. इस्राएलांनी त्यांच्या देशात प्रवेश केला आणि मोआबी लोकांची कत्तल करत गेले.

  2. त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला.

  3. आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.