Balaam
Balaam चा उल्लेख असलेली वचने
त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला: “इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत.
मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.
बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.
परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”
बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:
परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”
सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.”
तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.”
ते बलामाकडे आले आणि म्हणाले: सिप्पोरचा पुत्र बालाक असे म्हणतो: “माझ्याकडे येण्यासाठी तुला कोणतीही अडचण असू नये,
परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.
त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”
बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला.
जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले.
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले.
तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”
बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.”
गाढवीने बलामाला म्हटले, “मी तुझी ती गाढवी नाही काय जिच्यावर तू आजपर्यंत बसत आलास? मी तुझ्याशी कधी अशी वागणूक केली काय?” तो म्हणाला, “नाही.”
तेव्हा याहवेहने बलामाचे डोळे उघडले आणि त्याने रस्त्यावर तलवार उपसून उभे असलेल्या याहवेहच्या दूताला पाहिले आणि तो नमन करून पालथा पडला.
बलाम याहवेहच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. मला अडवावे म्हणून तुम्ही वाटेत उभे आहात हे मला समजले नाही. मग आता जर हे तुम्हाला आवडले नाही, तर मी माघारी जाईन.”
याहवेहच्या दूताने बलामाला म्हटले, “त्या पुरुषांबरोबर जा, परंतु जे मी तुला सांगेन तेच तू बोलावे.” म्हणून बलाम बालाकाच्या त्या सरदारांबरोबर गेला.
बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला.
बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?”
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.”
मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.