मुख्य मजकुरावर जा

Balaam

59 वचने · 1 कुटुंब सदस्य

Balaam चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथे बालाकाने गुरे व मेंढरे यांचे यज्ञ केले आणि त्यातील काही बलाम व जे सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना दिले.

  2. सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता.

  3. बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”

  4. बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्‍हा व मेंढा यांचे अर्पण केले.

  5. मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.

  6. परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.”

  7. तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”

  8. बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”

  9. याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.”

  10. मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”

  11. बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

  12. नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”

  13. आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.

  14. बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”

  15. बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्‍हा व मेंढा अर्पण केला.

  16. आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.

  17. जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला

  18. आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

  19. तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास.

  20. बलामाने बालाकाला उत्तर दिले, “तू ज्या दूतांना माझ्याकडे पाठवले त्यांना मी सांगितले नव्हते काय,

  21. मग त्याने हा संदेश दिला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

  22. त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला.

  23. ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

  24. त्यांनीच बलामाच्या सल्ल्यानुसार पेओरच्या प्रकरणात इस्राएली लोकांना याहवेहशी अविश्वासूपणा करण्यास भाग पाडले आणि याहवेहच्या लोकांना पीडेने मारले.

  25. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.