मुख्य मजकुरावर जा

Balaam

59 वचने · 1 कुटुंब सदस्य

Balaam चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरीही याहवेह तुमच्या परमेश्वराने बलामाचे ऐकले नाही, परंतु त्यांनी त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हावर प्रीती करतात.

  2. या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.

  3. जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले.

  4. परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले.

  5. कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.)

  6. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”

  7. ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत.

  8. त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.

  9. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी.