Skip to content

Midian

44 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Midianites

28.9300, 34.9000 गूगल नकाशावर पाहा

Midian चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  2. जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला.

  3. तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या.

  4. मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला.

  5. मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.”

  6. आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.

  7. मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,

  8. मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.

  9. आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती.

  10. कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

  11. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.

  12. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.

  13. ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

  14. इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले.

  15. पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.

  16. इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.

  17. कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.

  18. अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.

  19. मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले,

  20. गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.”

  21. याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?”

  22. अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्‍यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्‍यात होता.

  23. याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.”

  24. गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्‍यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.

  25. गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.”