मुख्य मजकुरावर जा

Midian

44 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Midianites

28.9300, 34.9000 गूगल नकाशावर पाहा

Midian चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.”

  2. जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.”

  3. तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.

  4. त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.

  5. आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला.

  6. परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.

  7. तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”

  8. जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.

  9. आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”

  10. त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल, याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या.

  11. अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.

  12. आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.

  13. ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.

  14. हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  15. पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी, किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा.

  16. कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.

  17. सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.

  18. उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.

  19. कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.