Skip to content

Midian

38 वचने · 14 कुटुंब सदस्य

Midian चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.

  2. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.

  3. हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  4. जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला.

  5. तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या.

  6. मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला.

  7. मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.”

  8. आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.

  9. मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,

  10. मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.

  11. आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती.

  12. कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

  13. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.

  14. ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

  15. इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले.

  16. पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.

  17. इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.

  18. कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.

  19. गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्‍यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.

  20. गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.”

  21. त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.”

  22. जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.”

  23. त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.

  24. परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.

  25. तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”