मुख्य मजकुरावर जा

Midian

38 वचने · 14 कुटुंब सदस्य

Midian चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.

  2. आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”

  3. त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल, याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या.

  4. अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.

  5. आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.

  6. ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.

  7. अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान.

  8. मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह.

  9. हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  10. कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.

  11. सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.

  12. उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.

  13. कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.