Abraham
हे नावानेही ओळखले जाते: Abram
Abraham चा उल्लेख असलेली वचने
तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.
तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.
अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.
मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.
याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.
याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.
अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला.
अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.
मग याहवेहने अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे.” तेव्हा जे अब्रामाला प्रकट झाले त्या याहवेहसाठी त्याने एक वेदी बांधली.
मग अब्राम निघाला आणि दक्षिणेच्या दिशेने चालू लागला.
त्यावेळी त्या देशात मोठा दुष्काळ पडला होता म्हणून अब्राम इजिप्तमध्ये राहण्यास गेला, कारण दुष्काळ फारच भयंकर होता.
अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे.
मग फारोहने तिच्यामुळे अब्रामाला मेंढरे, बैल, गाढवे, उंट तसेच गुलाम स्त्री व पुरुष अशा पुष्कळ देणग्या दिल्या.
परंतु याहवेहने अब्रामाची पत्नी साराय तिथे असल्यामुळे फारोहच्या घरावर भयंकर पीडा पाठविली.
तेव्हा फारोहने अब्रामाला बोलाविले आणि म्हटले, “तू माझ्याशी हे काय केले आहेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस?
अशा रीतीने अब्रामाने आपली पत्नी, सर्व संपत्ती आणि लोटाला घेऊन इजिप्त देश सोडला आणि ते नेगेव, म्हणजे दक्षिण, येथे पोहोचले.
अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.
व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते.
कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली.
तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत.
अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला.
लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक.
मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.
सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले.